आ. रोहित पाटलांना जि. प. सदस्याच्या कामाचेही श्रेय पुरेना -संजयकाकांचा हल्लाबोल

तासगाव तालुक्यातील खुजगाव येथे शाळेच्या नवीन खोल्यांच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला चक्क राजकीय रंग चढला. माजी खासदार संजय काका पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. जिल्हा परिषद सदस्याने आणलेल्या शाळेच्या खोल्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत ‘हापापलेली भिकारी प्रवृत्ती’ असा उल्लेख करत अशी कृती पुन्हा केल्यास ‘जशास तसे उत्तर देऊ,’ असा थेट इशाराही दिला.

Continue reading