२४७ वर्षांची परंपरा कायम! तासगावच्या ऐतिहासिक गणपती मंदिरात उद्यापासून पाच दिवस भाद्रपद मासोत्सवाला सुरुवात

मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या तासगावच्या ऐतिहासिक श्रीगणपती मंदिरात यंदाचा भाद्रपद मासोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. उद्या शनिवार, दि. १२ सप्टेंबरपासून ते बुधवार दि. १६ सप्टेंबरपर्यंत पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

Continue reading

‘अटल आनंदवन’ उपक्रमातून हरित महाराष्ट्राला हातभार; आरोग्य केंद्राच्या लोकसहभागातून उभारलेल्या सुविधांचा सत्कार

तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर परिसरात आरोग्य विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत ‘अटल आनंदवन’ वृक्षलागवड मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत तब्बल साडेसात हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.

Continue reading

पाण्याचा अपव्यय केल्यास 1000 रुपयांचा दंड, थेट कनेक्शन तोडणार; तासगाव नगरपरिषदेचा कडक निर्णय

तासगाव शहरात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांची आता खैर नाही. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नळधारकांवर तासगाव नगरपरिषदेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. अपव्यय करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.

Continue reading

तासगावात आर.ओ. वॉटर असोसिएशनचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात

आर.ओ. वॉटर असोसिएशन, तासगाव तालुक्याच्या वतीने आर.ओ. उद्योगातील व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर उत्साहात संपन्न झाले.

Continue reading

एक आशा, एक कॉल आणि दोन जीवांची सुटका; तासगाव मधील हृदयस्पर्शी घटना.

आदिवासी समाजातील गरोदर माता घरीच प्रसूती करतात, अशी रूढी अजूनही काही भागांत दिसून येते. मात्र योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर हस्तक्षेप झाला तर जीव वाचू शकतो, हे सांगलीच्या बेंद्री गावातील एका घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे. कल्पना राजेश वाघमारे या आदिवासी गरोदर मातेला तीव्र पोटदुखी झाल्यानंतर आशा स्वयंसेविका, १०८ रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालय तासगावच्या डॉक्टरांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रसूती यशस्वीरीत्या झाली. माता व बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

Continue reading

डॉल्बी बंदीचा ‘चिंचणी पॅटर्न’: महाराष्ट्राने दखल घ्यायलाच हवी!

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉल्बीचा मुद्दा पुन्हा तापला असला तरी, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी गावाने तर दोन वर्षांपूर्वीच यावर कायमचा तोडगा काढला आहे. चिंचणीचा हा ‘डॉल्बी बंदी पॅटर्न’ आता राज्याने आदर्श म्हणून घेणे गरजेचे आहे.

Continue reading

तासगाव येथे ३ सप्टेंबर १९४२ च्या ऐतिहासिक मोर्चाचा स्मृतीदिन उत्साहात साजरा

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद असलेल्या ३ सप्टेंबर १९४२ च्या तासगाव मोर्चाचा स्मृतीदिन आज तासगाव येथे अभिमानाने साजरा करण्यात आला.

Continue reading

मनोज जरांगेंच्या उपोषणाला तासगावातून पाठिंबा; सकल मराठा समाजाचे तहसीलदारांना निवेदन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांच्या तब्येतीत घसरण होत असूनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने मराठा समाजात संताप आहे.

Continue reading

तासगावात आबांच्या पुतळ्यासमोरच दारूचा अड्डा! दारू दुकान बंद करण्याची उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांची मागणी; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

ज्या आर. आर. आबांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत महाराष्ट्राला नवी दिशा दिली, त्यांच्याच पुतळ्यासमोर दारूचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तासगावात समोर आला आहे. पुतळ्यासमोरील दारूच्या दुकानातून दारू खरेदी करून काही जण थेट पुतळ्याच्या परिसरातील कट्ट्यावर बसून मद्यपान करत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, हे दारूचे दुकान बंद करण्याची मागणी उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी केली आहे.

Continue reading