तासगावात आर.ओ. वॉटर असोसिएशनचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात

डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनास व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संकेत पाटील /तासगाव

फूड इंडस्ट्रीजमधील संशोधक डॉ. महेश पाटील यांनी या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आर.ओ. उद्योगातील बदलते शासकीय नियम, पाण्याची गुणवत्ता व मानके, गुणवत्ता नियंत्रण, पाणी तपासणी प्रक्रिया आणि भविष्यातील व्यवसायाच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.

‘एकत्र येऊया, ज्ञान मिळवूया, व्यवसाय वाढवूया!’ या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एफएसएसएआय (FSSAI) रजिस्ट्रेशन, नवीन शासकीय नियमावली, उद्योगातील विविध समस्या व त्यावरील उपाय, आधुनिक तंत्रज्ञान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित व्यावसायिकांनी आपल्या अडचणी व प्रश्न मांडून डॉ. पाटील यांच्याशी थेट संवाद साधला.

या शिबिराला तालुक्यातील आर.ओ. व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मिळालेले मार्गदर्शन हे व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भालचंद्र काटकर होते. प्रास्ताविक मयूर लाड यांनी केले, सूत्रसंचालन संजय माळी यांनी केले तर आभार संतोष जाधव यांनी मानले.

आगामी काळात आर.ओ. व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि व्यवसाय विकासासाठी असोसिएशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *