डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून नायडू रुग्णालयाचा आढावा

पुणे, दि. २४ - शहरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी (दि. २४) बाणेर येथील डॉ. नायडू संसर्गजन्य आजार रुग्णालयाला भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. डेंग्यूच्या उपचारांसाठी पुरेशा खाटा आणि औषधसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून नायडू रुग्णालयाचा आढावा

आयुक्तांकडून डाॅ. नायडू रुग्णालयाचा आढावा

डेंग्यू उपचाराबाबत खाटा व औषधसाठांची पाहणी

या वेळी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले की, सद्यःस्थितीत महापालिका रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या उपचारासाठी पुरेसे बेड आणि औषधसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता, डेंग्यूची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या महापालिका किंवा इतर रुग्णालयांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. डॉ. नायडू रुग्णालयात डेंग्यू रुग्णांसाठी ५० स्वतंत्र खाटा उपलब्ध असून, त्यापैकी दररोज १० ते १५ खाटा वापरात असतात. येथे उपचार पूर्णपणे मोफत आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांत मोफत निदान चाचण्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.


सद्यःस्थितीत पुणे शहरात डेंग्यू उपचारासाठी खासगी रुग्णालयांत ४ हजार ४०९ खाटा (६७० आयसीयू खाटा) व महापालिका रुग्णालयांत ३३३ खाटा (६ आयसीयू खाटा) उपलब्ध आहेत. सरासरी ५० टक्‍के खाटा उपलब्ध असून, नागरिकांनी केवळ ठराविक मोठ्या रुग्णालयांमध्येच उपचाराचा आग्रह धरू नये, असे आवाहन आयुक्‍तांनी केले. डेंग्यू उपचारासाठी डॉ. नायडू रुग्णालयात ५० स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, दररोज १० ते १५ खाटा वापरात असून ३५ खाटा रिक्त आहेत. डॉ नायडू रुग्णालयातील उपचार पूर्णपणे मोफत आहे. गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर तातडीने कमला नेहरू व नायडू रुग्णालयात उपचार सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व डेंग्यू वॉर्ड्समध्ये रुग्णांसाठी मच्छरदाणीचा वापर अनिवार्य केला आहे.

Dengue, Dengue Beds, Dengue Cases, Dengue Outbreak, Dengue Prevention, Dengue Symptoms, Dengue Treatment, Dr Naidu Hospital, Health News, Maharashtra News, Naidu Hospital Pune, Nawal Kishore Ram, pmc, Pune Dengue, Pune Health News, Pune Municipal Commissioner, Pune Municipal Corporation, Pune News, Pune News Today, Right Angle Marathi

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत