दलितांची दाढी करण्यास नकार देणारे नाभिक जसे होते, तसेच गावच्या पाटलाची नजर चुकवून महारवाड्यात जाऊन दलितांची दाढी करणारे नाभिकही तेव्हा होते.

तात्या म्हणून परिचित असणाऱ्या लक्ष्मण म्हस्के यांना साहेबराव भाकरी आणायला लावायचे. त्यांना जवळ बसवायचे. ते स्वतः त्यांची भाकरी खात नव्हते; पण तात्यांना आपल्या भाकरीतून खायला द्यायचे.

दलितांची दाढी करण्यास नकार देणारे नाभिक जसे होते, तसेच गावच्या पाटलाची नजर चुकवून महारवाड्यात जाऊन दलितांची दाढी करणारे नाभिकही तेव्हा होते.

“तात्या, ती माझी भाकरी घेऊन या.”

“मी कशी तुमची भाकरी आणू? तुमची भाकरी शिवल्यावर ही माणसं काय म्हणतील?”

तात्या साहेबराव पाटलांना म्हणाले. त्यावर ते पुन्हा म्हणाले, “म्हणू दे काय म्हणायचं ते. तू पहिलं माझी भाकरी आण.”

तात्या म्हणून परिचित असणाऱ्या लक्ष्मण म्हस्के यांना साहेबराव भाकरी आणायला लावायचे. त्यांना जवळ बसवायचे. ते स्वतः त्यांची भाकरी खात नव्हते; पण तात्यांना आपल्या भाकरीतून खायला द्यायचे.

बाकीचे मराठा समाजातील लोक हे पाहायचे; पण सांगलीच्या खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा.)चे तत्कालीन सरपंच असलेल्या साहेबरावांना विरोध करण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती.

हळूहळू लोक बदलायला लागले. साहेबराव भाकरी आणायला सांगतात, मग आपल्याला काय होतंय, असा विचार करत लोकही हा बदल स्वीकारायला लागले.

बाबासाहेबांचा अस्पृश्यता निर्मूलनाचा विचार केवळ दलित समाजातच नव्हे, तर सवर्ण समाजातही असा झिरपत होता. कधी संघर्षातून, तर कधी माया-ममतेतून जातीच्या बेड्या हळूहळू सैल होत गेल्या.

यामध्ये संघर्षाच्या कहाण्या आपल्या समोर आल्या. त्यातून दलितांनी विद्रोहाची प्रेरणा घेतली. बंड केले. संघर्ष केला. पण त्या काळात साहेबराव पाटलांसारखे दलितांना जवळ घेणारे लोकही होते. त्यांचे चित्रण साहित्यात करणे महत्त्वाचे आहे.

दलितांची दाढी करण्यास नकार देणारे नाभिक जसे होते, तसेच गावच्या पाटलाची नजर चुकवून महारवाड्यात जाऊन दलितांची दाढी करणारे नाभिकही तेव्हा होते.

हा इतिहास जेव्हा पुढे येईल, तेव्हा या जातींमध्ये आणखी ममत्वभाव निर्माण होईल.

Ambedkar Thought, caste discrimination, Caste Equality, Caste System, Dalit History, Dalit Struggle, Dr Babasaheb Ambedkar, End Untouchability, Equality, Humanity, Maharashtra History, Social Equality, Social Justice, Social Reform, Untouchability

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत