Maharashtra Fisheries News | कोकणातील मच्छीमार आक्रमक; Fishing Ban Compensation ची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा konkan news

रायगड जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांसाठी १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ मासेमारी बंदी काळातील नुकसानभरपाई, EMI स्थगिती, स्मार्ट कार्ड, विमा, आधुनिक मच्छीमार मार्केटसह १३ प्रमुख मागण्यांसाठी कोकण किनारा मच्छीमार संघटनेने अप्पर विभागीय आयुक्तांना निवेदन देत तातडीने निर्णयाची मागणी केली.

Continue reading

जीवाश्म इंधन लॉबीकडून शेतकरी हिताला सुरुंग लावण्याचा कट; E20 ला विरोध म्हणजे मानवजातीचे अस्तित्व संपवणे — पाशा पटेल यांचा घणाघात

Ahilyanagar: अब्जावधी रुपयांचे परकीय चलन खर्चून आयात होणारे जीवाश्म इंधन आणि देशातच शेतकऱ्यांच्या घामातून तयार होणारे जैविक इंधन, या दोहोंमधील संघर्षात शेतकरी हिताचे मारेकरी नेमके कोण, असा थेट सवाल महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थित केला आहे. अहिल्यानगर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. गाड्या खराब होतात असे तकलादू कारण पुढे करून आणि अपप्रचार पसरवून देशाच्या व शेतकऱ्यांच्या हिताला सुरुंग लावणारे हे झारीतील शुक्राचार्य नेमके कोण आहेत, असा घणाघाती सवाल त्यांनी केला.

Continue reading

पोलीस ठाण्यात देवदेवतांचे फोटो, पूजा-अर्चा बंद? राधानगरी पोलिसांचा महत्त्वपूर्ण आदेश

कोल्हापूर : सरकारी कार्यालयांमध्ये धार्मिक प्रतिमा, देवदेवतांचे फोटो किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, आता राधानगरी पोलीस ठाण्याने आपल्या कार्यालयीन परिसरासाठी धर्मनिरपेक्षता, शिस्त आणि तटस्थता कायम ठेवण्याबाबत स्पष्ट कार्यालयीन आदेश जारी केला आहे.

Continue reading

NEET परीक्षेतील यशानंतर मुलीला पालकांकडून अनोखी वाढदिवसाची भेट । थेट दिल्लीतील संसद मार्चमध्ये सहभाग

डॉ. साधना पवार आणि डॉ. अमोल पवार या सांगलीच्या पलूस डॉक्टर दाम्पत्याने आपल्या मुलीला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे.

Continue reading