डॉ. साधना पवार आणि डॉ. अमोल पवार या सांगलीच्या पलूस डॉक्टर दाम्पत्याने आपल्या मुलीला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे.
मुलीचा या आठवड्यात वाढदिवस असल्याने, तिला वाढदिवसाची भेट म्हणून काय हवे आहे, असे तिच्या पालकांनी विचारले. त्यावर मुलीने सोनम (Sonam Wangchuk) वांगचुक आणि CJPच्या संसद मार्चमध्ये (CJP Jantar Mantar Protest) सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

मुलीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर दाम्पत्य थेट दिल्लीला पोहोचले. दिल्लीतील आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी असून, देशभरातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने Gen Z तरुण दिसत असल्याचे डॉक्टर साधना पवार यांनी म्हटले आहे.
“Gen Z मध्ये दम आहे… I love Gen Z!” अशा शब्दांत त्यांनी तरुण पिढीच्या उत्साहाचे कौतुक केले.
मुलीच्या वाढदिवसानिमित्त महागडी भेटवस्तू देण्याऐवजी, तिच्या विचारांना आणि सामाजिक जाणीवेला प्रोत्साहन देत पालकांनी दिलेली ही अनोखी भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
