आकारामच्या कुटुंबासाठी चार गावांतील शेतकरी एकवटले

लोढे (ता. तासगाव) येथील तरुण शेतकरी आकाराम प्रल्हाद रुपनर यांचा ३ ऑगस्ट रोजी लोढे तलावावर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार असलेल्या आकाराम यांच्या अकाली निधनाने रुपनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या प्रसंगी लोढे तलावातील लाभधारक शेतकरी बांधवांनी माणुसकीची जपणूक करत रुपनर कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला.

Continue reading

स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव म्हणणाऱ्या पाटीखालीच गेले 3 दिवस महिलांचे स्वच्छतागृह कुलूपबंद!

एकीकडे शासन स्वच्छ भारत, स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव म्हणून कोट्यवधींच्या जाहिराती करते, दुसरीकडे त्याच तासगावच्या मध्यवर्ती बसस्थानकावरील महिलांचे स्वच्छतागृह गेले तीन दिवस कुलूपबंद आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत असून एसटी महामंडळाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

Continue reading