तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील; उपसभापतीपदी सुखदेव पाटील बिनविरोध

तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा महेश पाटील यांची तर उपसभापतीपदी सुखदेव भीमराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली तसेच गुलाल उधळून आनंद साजरा केला.

तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील; उपसभापतीपदी सुखदेव पाटील बिनविरोध

संकेत पाटील – तासगाव

तासगाव पंचायत समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. सभापती व उपसभापती या दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी यांनी दोघांचीही निवड बिनविरोध घोषित केली. त्यानंतर उपस्थित सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील, ज्योतीताई पाटील तसेच पंचायत समितीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी सभागृहाबाहेर मोठा जल्लोष केला.

तासगाव पंचायत समितीच्या राजकारणात गेल्या तीन ते चार दशकांपासून आर. आर. पाटील गटांचे वर्चस्व राहिले होते. मात्र गेल्या काही वर्षांत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. विशेषतः पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी मिळाल्याने राजकीय वातावरणातही बदल दिसून येत आहे.

यावेळी झालेल्या सभापती व उपसभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.मात्र अखेरीस एकमताने निर्णय झाल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध पार पडली.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडीमुळे तालुक्यातील राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या गटाला फक्त तीन जागांवर यश मिळाले, तर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला आठ जागांवर विजय मिळवता आला.व त्यांनी पंचायत समितीवर एक हाती सत्ता स्थापन केली.

सभापतीपदी निवड झाल्यानंतर अरुणा पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका व्यक्त केली. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, शेती आणि शिक्षण या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासकामे राबवली जातील, असे त्यांनी सांगितले.

उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सुखदेव पाटील यांनीही पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सर्व सदस्यांच्या सहकार्याने तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पंचायत समितीच्या परिसरात समर्थकांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, आणी एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला.

तासगाव पंचायत समितीच्या या बिनविरोध निवडीमुळे तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

#panchayat samiti tasgav, #rohit pawar, #sangli, #sanjaykaka patil, #tasgav

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत