बालेवाडी मेट्रो स्टेशनजवळ स्कायवॉक कामासाठी महामार्गावरील वाहतूकीत बदल

पिंपरी । राईट अँगल 

बालेवाडी मेट्रो स्टेशन क्रमांक १० येथे फुट ओव्हर ब्रिज (स्कायवॉक) उभारणीचे काम करण्यात येणार असल्यामुळे मुंबई–बेंगलोर महामार्गावरील मुख्य रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करून ती शेजारील सेवा रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ही वाहतूक व्यवस्था १४ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून १५ मार्च २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.

मुंबईकडून साताऱ्याकडे तसेच साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य महामार्गाने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत वाहनचालकांना शेजारील सेवा रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा लागणार आहे. बालेवाडी मेट्रो स्टेशन परिसरात फुट ओव्हर ब्रिजच्या कामासाठी हा वाहतूक बदल करण्यात येत असून त्यानुसार वाहतूक वळविण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

———————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल 

बातमीसाठी संपर्क : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *