राजकीय ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांचा रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचा आदेश ?

मुंबई ! राईट अँगल

नाशिक येथील अशोक खरात प्रकरण भोवल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर दबाव वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत तातडीने कारवाईचे संकेत दिले असून चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत अशोक खरात प्रकरणातील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे स्पष्ट निर्देश दिल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून पुढील काही तासांत रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत अधिकृत घोषणा कधी होणार, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. नुकत्याच चाकणकर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाल्या आहेत.

———————-

बातमीसाठी संपर्क : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *