ऐतवडे बुद्रुक मध्ये चवदार तळे सत्याग्रहानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

सांगली । प्रदीप लोखंडे

ऐतवड्डे बुद्रुक येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या दिनानिमित्त महिलांनी अभिवादन करत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित महिलांनी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांचा जागर केला.

कार्यक्रमादरम्यान येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासिका उपस्थित होत्या. सर्वांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

—————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल 

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *