७ जण ताब्यात, रोख रक्कम जप्त ; चिंचवड पोलिसांची कारवाई
पिंपरी । राईट अँगल
पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड परिसरात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करत ७ जणांना ताब्यात घेतले. २३ मार्च २०२६ रोजी रात्री ११:४० वाजण्याच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील एमआयडीसी कॉलनी परिसरातील आसीम शेख यांच्या गोडाऊनबाहेर ही कारवाई करण्यात आली.
चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई उमेश देवचंद वानखडे यांच्या कारवाईत रिजवान शेख (वय २१), वलीकुमार मंडल (वय १९), अशोक पंजवानी (वय ५०), दिलीप सिंग (वय ४७), अरुण सिंग (वय ४२), सुनिल दळवी (वय ५१) आणि लुकमान शेख यांना पकडण्यात आले. हे सर्वजण मजुरी, भाजी विक्री व गॅरेज व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.
सदर आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘तीन पत्ती’ या पत्त्यांच्या खेळावर पैसे लावून जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १५,६५० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
—————————————
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
संपर्क क्रमांक : 7350266967
