तासगाव-कवठेमहांकाळमध्ये नशा, जुगार आणि अवैध वेश्याव्यवसायाचा विळखा!

मुंबई :

अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल रात्री उशिरा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या विळख्यावर अर्धा तास चर्चा करत ठोस मुद्दा उपस्थित केला.
आमदार रोहित पाटील म्हणाले, “गांजा व इतर नशेच्या पदार्थांचा लहान मुलांपासून तरुणांपर्यंत वाढता प्रभाव अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे तरुण पिढीचे भविष्य अंधकारमय होत आहे. पालकांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.”
यासोबतच तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात खुलेआम सुरू असलेल्या आकडे,जुगार आणि अवैध वेश्याव्यवसायाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या गैरप्रकारांमध्ये पोलिस यंत्रणेचीही काही प्रमाणात सहभागिता आहे का, असा गंभीर प्रश्न आमदार रोहित पाटील यांनी उपस्थित केला.
तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समाजातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले.
माननीय राज्यमंत्री यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना संबंधित विषयांमध्ये तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आमदार रोहित पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *