च-होलीत ५४८ ग्रॅम गांज्यासह तरुण अटक

 दिघी पोलिसांची कारवाई 

पिंपरी । राईट अँगल 

च-होली परिसरात पोलिसांनी कारवाई करत १९ वर्षीय तरुणाला ५४८ ग्रॅम गांज्यासह अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ७ एप्रिल) दुपारी सुमारे १ वाजून २५ वाजण्याच्या सुमारास पठारे चौकातून लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला करण्यात आली.

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार शरद अशोक विंचू यांनी फिर्याद दिली आहे.

आर्यन कृष्णा रसाळ (वय १९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे ५४८ ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे २७ हजार ४०० रुपये जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

—————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल 

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *