पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी स्वीकारला पदभार

पिंपरी । राईट अँगल 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) येथे अतिरिक्त महानगर आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज, १० एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पदभार स्वीकारल्यानंतर के. मंजुलक्ष्मी यांनी पीएमआरडीएच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. 

यावेळी सहआयुक्त रूपाली आवले-डंबे, पूनम मेहता, मुख्य वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, संचालक (विकास परवानगी) अविनाश पाटील, उपसंचालक स्मिता कलकुट्टी, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, उपायुक्त हिंमत खराडे, राजेश माशेरे, तहसीलदार आशा होळकर तसेच जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे आदी अधिकारी उपस्थित होते.

——————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल 

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *