जयंतीनिमित्त बाबासाहेबांना पाटील यांचे अभिवादन
सांगली : प्रदीप लोखंडे
पुरेसा पाणीपुरवठा, सोलर यंत्रणेची सुविधा, स्मशानभूमी दुरुस्ती यासह गावातील विविध प्रलंबित कामांची लवकरच पाहणी करून अत्यावश्यक कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन कामेरी येथील जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महोत्सव समितीच्या सदस्यांशी संवाद साधताना त्यांनी गावातील विविध समस्यांची माहिती घेतली व लवकरच त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दादासो कांबळे, शासकीय अधिकारी प्रवीण लोखंडे, मुंबई पोलिस अमोल कांबळे, पत्रकार सुनील पाटील, प्रभाकर कांबळे, रामदास कांबळे, सागर कांबळे, सचिन वाघमारे, विपुल कांबळे यांच्यासह महोत्सव समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी गावातील अपूर्ण कामांचा आढावा मांडला. विशेषतः पाणीपुरवठ्याची समस्या, वॉर्ड क्रमांक एक मधील स्मशानभूमी दुरुस्ती, तसेच सोलर व्यवस्थेची गरज याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व कामांना प्राधान्य देऊन आवश्यक त्या निधीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जयराज पाटील यांनी स्पष्ट केले.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित पाटील, भाजपचे नेते अशोक पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद बुद्रुक, पंचायत समिती सदस्य प्रकाश माळी, ऐतवडे बुद्रुक गावचे सरपंच सुभाष कुंभार, उपसरपंच अजिंक्य पाटील, संदीप गायकवाड, रोहित माळी, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
——————————
बातमीसाठी संपर्क :
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
मो. नं : 7350266967
