Sangli Breaking | तासगावात 70 कामगारांना मंजुरी, विकासाला वेग | Latest Maharashtra News |

तासगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, प्रलंबित प्रस्तावांच्या निवारणाला अखेर गती मिळाली आहे. आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तब्बल 70 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

Sangli Breaking | तासगावात 70 कामगारांना मंजुरी, विकासाला वेग | Latest Maharashtra News |

संकेत पाटील /तासगाव

ही बैठक बांधकाम कामगार(Building construction labour) समितीची पहिलीच बैठक ठरली आणि त्यातच प्राथमिक पूर्तता झालेल्या प्रकरणांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने अनेक कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दोन आठवड्यांत 2000 प्रकरणे निकाली काढण्याचा निर्धार

प्रशासनाने यावेळी मोठा टार्गेट ठेवत, पुढील दोन आठवड्यांत 2000 हून अधिक प्रकरणे मंजूर करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रलंबित फाईलींची छाननी वेगाने पूर्ण करून कामगारांना त्यांच्या हक्काचा लाभ वेळेत मिळावा, यावर भर देण्यात आला.

प्रशासनाला कडक सूचना
बैठकीत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देत म्हटले की:

  • कागदपत्रांची तपासणी तातडीने पूर्ण करा
  • प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढा
  • विभागांमध्ये समन्वय वाढवा आणि गतीने काम करा
    अनेक महिने रखडलेल्या प्रस्तावांना न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

कामगारांमध्ये आशेचा किरण
या निर्णयामुळे तासगावातील बांधकाम कामगारांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासनाने कार्यपद्धती अधिक सक्षम करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

बैठकीस बांधकाम कामगार समितीचे अधिकारी, स्थानिक कामगार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#MaharashtraNews, #sangli, #tasgav, right angle marathi tasgoan, Rohit r r patil, Tasgoan news

sagar gotpagar

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत