विरोधकांनी आरक्षणास विरोध करून महिलांचा अवमान केला : नगरसेविका शैलजा मोरे

महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ माजी उपमहापौर शैलजा मोरे सभागृहात आक्रमक

पिंपरी । राईट अँगल 

नारीशक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) हा देशाच्या लोकशाही इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असताना, या विधेयकावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली. संसदेत काही विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद स्थानिक स्तरावरही उमटले.

सभेदरम्यान माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवत सभा तहकुबीची मागणी केली. आपल्या भाषणात त्यांनी महिलांच्या योगदानाचा उल्लेख करत, जिजाऊंसारख्या मातांनी समाज आणि राष्ट्र घडविण्यात मोलाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले. महिलांचे स्थान केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून, त्या नेतृत्वक्षम आणि निर्णयक्षम आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.

महिला आरक्षणाला विरोध करणे म्हणजे महिलांचा अवमान असल्याचेही मोरे यांनी स्पष्ट केले. महिलांना राजकारणात समान संधी मिळणे गरजेचे असून, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी अशा कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

————————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल

बातमीसाठी संपर्क : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *