बकरी ईद निमित्त काँग्रेसचे ‘मोहब्बत का गुलाब’ उपक्रम

बकरी ईद निमित्त काँग्रेसचे 'मोहब्बत का गुलाब' उपक्रम
  • काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिल्या शुभेच्छा

पिंपरी ! राईट अँगल

बकरी ईदनिमित्ताने काँग्रेसकडून चिंचवड गाव येथील ईदगाह जवळ सकाळच्या नमाज नंतर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा देण्यात आल्या. चापेकर चौकातील ईदगाह समोर सकाळी आठ वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित जमले आणि नमाजला आलेल्या मुस्लिम बांधवांना मोहब्बत का गुलाब देऊन बंधुता, प्रेमाचा संदेश देत ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

याबद्दल माहिती देताना काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले, “प्रेम, त्याग, बलिदान, शांती, सद्भाव यांचा संदेश देणारा इस्लाम धर्म आणि त्या अंतर्गत येणाऱ्या बकरी ईद या उत्सवानिमित्त मोहब्बत का गुलाब देत मुस्लिम बांधवांना आपुलकी, प्रेम, एकोपा आणि बंधू भावाचा संदेश देत ईदच्या शुभेच्छा देत आहोत, आज देशामध्ये वाढत असलेली सामाजिक अराजकता पाहिली तर सत्ताधारी हे हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजताना दिसतात पण कोणत्याही सत्तेपेक्षा सत्य हे मोठे असते आणि ते सत्य हे समतेचे आहे. प्रेमाचे आहे, बंधू भावाचे आहे. हे या भारत भूमीने आपणाला अनेक वेळा दर्शविले आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हू, या ब्रीदवाक्य प्रमाणे सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मुस्लिम बांधवांनी आभार व्यक्त करत ईदगाह समितीच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचा सन्मान केला. मोहब्बत का गुलाब या सेवा उपक्रम प्रसंगी, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेसचे माजी सरचिटणीस जितेंद्र छाबडा, हरिष डोळस, सेवा दलाचे ज्येष्ठ पदाधिकारी उमेश बनसोडे, अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, युनूस बागवान, कुणाल भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *