तासगाव MIDC च्या कामास गती.

आढावा बैठकित प्रशासनाकडून अनुकूल दिशा

संकेत पाटील /तासगाव

तासगावचे विधानसभा सदस्य मा. रोहित सुमन आर.आर. पाटील यांनी प्रधान सचिव (उद्योग) व एम.आय.डी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर प्रत्यक्ष सादरीकरण करत, तासगाव औद्योगिक क्षेत्राची सद्यःस्थिती व गुंतवणूकविषयक मांडणी सविस्तरपणे सादर केली.

या बैठकीत काही नामांकित कंपन्यांना आम्ही दिलेल्या प्रेझेंटेशन बाबत माहिती दिली आणि त्याअनुषंगाने तासगाव औद्योगिक क्षेत्राच्या पुढील वाटचालीसंदर्भात ठोस व कृतीशील दिशा निश्चित करण्यात आली. मा. प्रधान सचिव (उद्योग) यांनी संबंधित विभागांना या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याबाबत सूचित केले

योगेवाडी व मणेराजुरी झोनमधील पायाभूत सुविधा कामे, भूसंपादनविषयक प्रक्रियेस गती, भूखंड दराची अधिसूचना, तसेच देशी व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसमोर क्षेत्राची मांडणी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रशासनाने या प्रस्तावांचे सकारात्मक स्वागत करत, उपस्थित विषयांवर अनुकूल दिशा सूचित केली.

परिसरातील विद्यमान कृषी-आधारित अर्थव्यवस्था व पर्यावरण यांचे जतन करत औद्योगिक विकास साधण्याच्या भूमिकेसही बैठकीत मान्यता देण्यात आली; शाश्वत विकास हे या उपक्रमाचे घोषित उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमार्फत (NEERI) होणाऱ्या पर्यावरणीय अभ्यासाद्वारे क्षेत्रात अनुमत उद्योगांची निश्चिती केली जाईल.

बैठकीसाठी करण्यात आलेली सुसंगत तयारी व सादर मांडणीची प्रशासनाकडून नोंद घेण्यात आली. “तासगाव शाइन्स” या संकल्पनेअंतर्गत — लोकांची एम.आय.डी.सी. — पुढे नेल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे उद्दिष्ट, मंजूर शासकीय पायाभूत सुविधांचे रूपांतर तासगाव तालुक्यातील स्थानिक रोजगार व औद्योगिक हालचालींमध्ये करणे, हे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *