पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन सतर्क
पिंपरी । राईट अँगल
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांनी ३१ मे रोजी मोठी संयुक्त कारवाई करत अवैध हातभट्टी दारू, मद्यनिर्मितीचे रसायन, गावठी दारू आणि विदेशी मद्याचा साठा जप्त केला. शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांनी विविध ठिकाणांहून गावठी हातभट्टी दारू, मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन, ड्रम, प्लास्टिक कॅन, बाटल्या तसेच विदेशी व देशी मद्याचा साठा जप्त केला. काही ठिकाणी हजारो लिटर मद्यनिर्मितीचे रसायन नष्ट करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी दारू निर्मिती आणि मद्यनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या घातक रसायनांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छापेमारी झालेली प्रमुख ठिकाणे –
भोसरी, भोसरी एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी, चिंचवड, रावेत, देहूरोड, दक्षिण चाकण, दक्षिण म्हाळुंगे, हिंजवडी, सांगवी, पिंपरी आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली.
——————
