तासगावात आबांच्या पुतळ्यासमोरच दारूचा अड्डा! दारू दुकान बंद करण्याची उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांची मागणी; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
ज्या आर. आर. आबांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत महाराष्ट्राला नवी दिशा दिली, त्यांच्याच पुतळ्यासमोर दारूचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तासगावात समोर आला आहे. पुतळ्यासमोरील दारूच्या दुकानातून दारू खरेदी करून काही जण थेट पुतळ्याच्या परिसरातील कट्ट्यावर बसून मद्यपान करत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, हे दारूचे दुकान बंद करण्याची मागणी उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी केली आहे.
