एक आशा, एक कॉल आणि दोन जीवांची सुटका; तासगाव मधील हृदयस्पर्शी घटना.

आदिवासी समाजातील गरोदर माता घरीच प्रसूती करतात, अशी रूढी अजूनही काही भागांत दिसून येते. मात्र योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर हस्तक्षेप झाला तर जीव वाचू शकतो, हे सांगलीच्या बेंद्री गावातील एका घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे. कल्पना राजेश वाघमारे या आदिवासी गरोदर मातेला तीव्र पोटदुखी झाल्यानंतर आशा स्वयंसेविका, १०८ रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालय तासगावच्या डॉक्टरांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रसूती यशस्वीरीत्या झाली. माता व बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

Continue reading