रत्नागिरीत पत्रकारावर हल्ला करणारे आरोपी अद्याप मोकाटच । पोलिसांवर कुणाचा दबाव?
रत्नागिरी येथील पत्रकार दीपक भागवत यांच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करून घेतला खरा पण सीसीटीव्हीमध्ये आरोपींचा चेहरा स्पष्ट दिसत असतानाही हल्लेखोर मात्र अद्यापही मोकाट आहेत. पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
