पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांची शेकडो किमीची पायपीट,आता परतीचे वेध,वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट आणि शिक्षणापासून वंचित पिढी,मेंढपाळांच्या संघर्षाची व्यथा
शहरीकरणाचा फास
जिल्ह्यात वाढत चाललेले औद्योगीकरण आणि शहरीकरण यामुळे कृषी क्षेत्र आणि गायरान जमिनी कमी होत आहेत. परिणामी, मेंढपाळांना चारा आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जागाच उरली नाही तर मेंढ्या चरायच्या कुठे? असा प्रश्न आता या मेंढपाळांसमोर उभा ठाकला आहे.
