रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती : आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवड शहरातील झपाट्याने होणारे नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता महावितरणच्या सध्याच्या यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी देहूरोड शाखा कार्यालयाचे विभाजन करून रावेत येथे स्वतंत्र कार्यालय करावे, तसेच काळेवाडी, हिंजवडी आणि बिजलीनगर या मोठ्या विभागांमधील कार्यालयांचेही तात्काळ विभाजन करावे, अशी आग्रही मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी केली.दरम्यान ताथवडे येथील ‘यशदा’ प्रकल्पासाठीची जागा ताब्यात घेऊन तिथे अतिउच्च दाब सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करण्याबाबत देखील सूचनादेखील आमदार जगताप यांनी केल्या आहेत.
