कर थकवाल तर थेट ‘सील’! तासगाव पालिकेची धडक मोहीम; नळ कनेक्शनही कापले.

तासगाव नगरपरिषद प्रशासनाने २०२५–२६ या आर्थिक वर्षातील घरपट्टी, पाणीपट्टी आणि गाळाभाडे वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून शहरात विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवून पालिकेच्या पथकांकडून धडक कारवाई केली जात आहे.

कर थकवाल तर थेट ‘सील’! तासगाव पालिकेची धडक मोहीम; नळ कनेक्शनही कापले.

तासगाव /प्रतिनिधी

तासगाव नगरपरिषद प्रशासनाने २०२५–२६ या आर्थिक वर्षातील घरपट्टी, पाणीपट्टी आणि गाळाभाडे वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून शहरात विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवून पालिकेच्या पथकांकडून धडक कारवाई केली जात आहे.

गुरुवारी सकाळी शहरातील एका मोठ्या थकबाकीदाराची मालमत्ता पालिकेने सील केल्याने शहरात खळबळ उडाली. वसुली पथक कर वसुलीसाठी संबंधित मालमत्ताधारकाकडे पोहोचले असता कर्मचारी आणि थकबाकीदार यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेने संबंधित मालमत्ता सील करण्याची कारवाई पूर्ण केली.

पालिकेने स्पष्ट केले आहे की, ज्या मालमत्तांची घरपट्टी व पाणीपट्टी थकीत आहे, त्या मालमत्तांचे नळ कनेक्शनही तोडले जाणार आहेत. त्यामुळे कर थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शासनाच्या IWBP संगणकीय प्रणालीनुसार कर आकारणीमध्ये कडक बदल करण्यात आले आहेत. थकीत रकमेसोबतच चालू बिलावरही दरमहा २ टक्के दंड आकारला जात आहे.

या संदर्भात मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की,

शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वेळेत वसुली अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही कारवाई टाळण्यासाठी आपली थकबाकी तात्काळ भरावी आणि नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे.

अधिक माहितीसाठी नागरिकांनी तासगाव नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत