दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यात जमावबंदी आदेश लागू

दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यात जमावबंदी आदेश लागू

पुणे ! राईट अँगल

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सन २०२५-२६ चे उन्हाळी अवर्तन सुरळीत पार पाडण्याकरीता अवर्तन संपेपर्यंत खडकवासला मुठा-उजवा कालव्याचे दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

शेटफळगडे, अकोले, पारवडी, निरगुडे, कळस, लोणी देवकर, रावणगाव, नंदादेवी, मळद, शिर्सूफळ, पारवडी, गिरीम, गोपाळवाडी, माळवडी, मेरगळवाडी व इंदापूर भागात कालव्याचे दोन्ही बाजूस १०० मीटर अंतरावर या ठिकाणासह कालव्याच्या पूर्ण परिसरात जमावबंदी आदेश लागू राहणार आहे.

या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतूदी व प्रचलित काद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

—————————

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल

संपर्क क्रमांक : 7350266967

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत