- बस प्रवासातील दागिने चोरणारी महिला टोळी जेरबंद
पिंपरी ! राईट अँगल
बसमधून लहान मुलांना सोबत घेऊन प्रवाशांचे लक्ष विचलित करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला टोळीचा गुन्हे शाखा, युनिट-३ पिंपरी चिंचवड यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८९ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल जावळे, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बो-हाडे, सागर सुर्यवंशी, मनोज साबळे, गोनटे, स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे, तुषार वराडे, समिर काळे, सुंदर थोरात, सुधिर दांगट, निखिल फापाळे, राजकुमार इघारे आदी पथकाने तपास केला.
तपासादरम्यान घटनास्थळापासून शिक्रापूरपर्यंत विविध रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपी गुन्हा करून रिक्षा व ट्रकच्या सहाय्याने पळून जात असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना त्या जातेगाव खुर्द (ता. शिरूर, जि. पुणे) येथे राहत असल्याचे समोर आले. तेथे सापळा रचून महिला सहाय्यक कक्षाच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेण्यात आले.महिला सहाय्यक कक्षातील अधिकाऱ्यांच्या सहाय्याने आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ८९ हजारांचा ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २१ मार्च २०२६ रोजी हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
———————————————-
बातमीसाठी संपर्क :
- प्रदीप लोखंडे : 7350266967
