पेट्रोल-डिझेल अफवा फेक! तासगाव तहसीलदारांचे नागरिकांना मोठे आवाहन

तासगाव शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांनी अचानक जोर धरला. यामुळे काही पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, प्रशासनाने याबाबत स्पष्ट केले आहे की, शहर व परिसरात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

पेट्रोल-डिझेल अफवा फेक! तासगाव तहसीलदारांचे नागरिकांना मोठे आवाहन

संकेत पाटील /तासगाव

तहसीलदार अतुल पाटोळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “पेट्रोल संपल्याच्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत. सध्या इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून अनावश्यक गर्दी करू नये.”
अफवांमुळे काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या, परंतु प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती सुरळीत केली. तहसीलदार पाटोळे यांनी याबाबत इशारा देताना म्हटले की, “जाणीवपूर्वक अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावर किंवा अन्य मार्गाने चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष आहे. अशा कृत्यांना मुळीच सहन केले जाणार नाही.”

•संयम बाळगावा आणि नेहमीप्रमाणे इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर जा.

•कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत प्रशासनाच्या माहितीवरच विश्वास ठेवावा.

दरम्यान, तासगावात अफवांपेक्षा वास्तव पूर्णपणे वेगळे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

#atul patole, #dizel, #petrol, #sangli, #tasgav

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत