वर्ष अखेर व्याज गणनेच्या कारणास्तव तांत्रिक संगणकीय आज्ञावाली व्यवस्थित चालावी म्हणून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन दिवसासाठी सबंध भारतातील टपाल कार्यालये Indian post नागरिकांसाठी सेवेसाठी उपलब्ध राहणार नाहीत.
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. जिकडे नागरिकांची अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात टपाल कार्यालय यांच्यामध्ये गर्दी पहावयास मिळत असताना डाक विभाग देखील तेवढ्याच तत्परतेने भारतीय नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्धतेने सेवा उपलब्ध करून देत आहे. परंतु आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन दिवसांसाठी (दि. एक एप्रिल 2026 ते 2 एप्रिल 2026) या कालावधीसाठी भारतीय टपाल विभागाच्या अल्पबचत गुंतवणुकीच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी व्याज गणनेच्या च्या कामासाठी बंद राहणार आहेत. या कालावधी मध्ये अल्पबचत योजनांमध्ये (small saving schemes) नागरिकांनी आपली गुंतवणूक केलेल्या बचत खाते, सुकन्या खाते, पी पी एफ खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक प्राप्ती योजना या सर्व खात्यामध्ये व्याज जमा करण्याचे काम संगणकीय प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे,अशी सूचना पुणे शहर पूर्व टपाल विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात पूर्व विभागाचे प्रमुख मा श्री समीर महाजन भारतीय टपाल सेवा,प्रशासन अधिकारी यांनी दिली आहे. या दोन दिवसाच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिसच्या (post office)काउंटरवर अल्पबचत चे काउंटर व इतर सेवा नागरिकांसाठी बंद राहणार आहेत. तसेच आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात गुंतवणूक करण्यासाठी नवीन खाते उघडणे नागरिकांची चेक स्वीकारणे अशा विना संगणकीय कामासाठी टपाल कर्मचारी उपलब्ध राहतील. परंतु गुंतवणुकीसाठी देण्यात आलेल्या चेकची वठणावळ 2 एप्रिल नंतरच केली जाईल.परंतु टपाल वितरणावर याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. टपाल वितरण अखंडितपणे सुरूच राहणार आहे. 3 एप्रिल 2026 रोजी गुड फ्रायडे निमित्त सर्व शासकीय कार्यालयांना शासकीय सुट्टी (Government holiday)असल्या कारणास्तव टपाल कार्यालय देखील या दिवशी बंद राहतील. त्यामुळे 4 एप्रिल 2026 पासून टपाल कार्यालये पुन्हा सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध राहतील.
या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या स्पीड पोस्ट,पार्सल सेवेच्या बुकिंग संदर्भातील कोणत्याही शंका निरसणासाठी 8421372317 या मोबाईल नंबर संपर्क करण्याचे आवाहन पुणे शहर Pune City पूर्व विभागाने केले आहे.
” नागरिकांनी टपाल विभागात केलेल्या गुंतवणुकीवर व्याज गणनेच्या कामासाठी टपाल कार्यालय दोन दिवस बंद राहणार आहेत या दोन दिवसाच्या कालावधीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे व त्यानुसार आपल्या आर्थिक कामकाजाचे नियोजन करावे”
