पिंपरी । राईट अँगल
भोसरी परिसरात डिलिव्हरीच्या कारणावरून सुरू असलेला वाद विकोपाला जात एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना 28 मार्च 2026 घडली. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर तीन विधीसंर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
२८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास महादेव नगर, भोसरी येथील ब्लिंकीट सुपर स्टोअरसमोर ही घटना घडली. एकाने या बाबत फिर्याद दाखल केली. दोघांसह तीन विधीसंर्षित बालक यांनी संगनमताने दुचाकीवर येत गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या कारणावरून फिर्यादीच्या भावावर कोयत्याने हल्ला केला. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर, हातावर व इतर ठिकाणी वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांना आत जाण्यास प्रतिबंध केला. हातात कोयते घेऊन त्यांनी परिसरात दहशत निर्माण करत “कोणी मध्ये आले तर अशीच अवस्था करू” अशी धमकी दिली आणि त्यानंतर तेथून पळ काढला.
भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून उर्वरित तीन विधीसंर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
————————-
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
संपर्क क्रमांक : 7350266967
