संत तुकारामनगर पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई

पिंपरी । प्रदीप लोखंडे

संत तुकारामनगर पोलीस ठाणे तपास पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एकूण ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे ५ लाख ९५ हजार रुपये आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यांची जलद उकल करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ संदिप आटोळे आणि सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग सचिन हिरे यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरीच्या घटनांचा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे छडा लावण्याचे निर्देश दिले होते.

संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी संतोष शिवराम घारे (वय ४४, रा. ओझर्डे, ता. मावळ, जि. पुणे) याला कामशेत येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून एकूण ११ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून सर्व ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ संदिप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील, पोलीस अंमलदार दत्तु पाटेकर, अनिल मोहीते, ज्ञानेश्वर भुरे, भागवत गायकवाड, विठ्ठल भारमळ, जावेद मुजावर, संतोष राजपूत आणि सुनील धावारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

—————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *