गॅस टँकर मधून अवैध काळाबाजार; चाकण पोलिसांची तिघांवर कारवाई
पिंपरी । प्रदीप लोखंडे
चाकण-शिक्रापूर रोडवरील भोसे गावाजवळ इंडियन ऑयल गॅस प्लांट परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पहाटे ४.४० वाजता उत्तर चाकण पोलिसांनी छापा टाकून तिघांना रंगेहाथ अटक केली.
अंबादास गाडे, अक्षय मुंगसे आणि नवनाथ होजगे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गॅस टँकरचे आउटलेट सिल तोडून कोणतीही सुरक्षा साधने न वापरता थेट घरगुती सिलिंडरमध्ये गॅस भरत होते. या बेकायदेशीर कृत्यामुळे मोठा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला होता.
सुमारे ४९ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फायदा घेत आरोपी अवैधरित्या गॅस भरून चढ्या दराने विक्री करत होते.
जलद पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी आरोपी स्वतःचा आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालत असल्याचे पोलिसांनी नमूद केले असून पुढील तपास सुरू आहे.
————————————
प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल
संपर्क क्रमांक : 7350266967
