हिंजवडी फेज-२ मध्ये केबल दुरुस्तीमुळे वाहतुकीत अडथळे

विप्रो सर्कल ते एमआयडीसी सर्कलदरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरा ; परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांचे आवाहन 

पिंपरी । राईट अँगल 

हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत हिंजवडी फेज-२ परिसरात विप्रो सर्कल ते एमआयडीसी सर्कल दरम्यान मेट्रो स्टेशन क्रमांक-३ (पीएमआर-३) खाली डॉलर कंपनीजवळ महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीच्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या बिघाडाच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे या मार्गावर वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्या या ठिकाणी एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र पीक अवर्समध्ये सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सहा ते आठ वाजेदरम्यान वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना योग्य नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा किंवा वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. तसेच गर्दी टाळण्यासाठी प्रवासाचे वेळापत्रक बदलण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

सदर केबल दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून २६ एप्रिल २०२६ पर्यंत काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.

—————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *