रहाटणी–पिंपळे सौदागरमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त भव्य बुद्धरूप मिरवणूक

पिंपरी । राईट अँगल

रहाटणी–पिंपळे सौदागर परिसरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६९ व्या जयंतीनिमित्त भव्य “बुद्धरूपाची मिरवणूक” आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात व व्यापक प्रमाणावर करण्यात आले असून परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी केले आहे.

ही मिरवणूक शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आनंद बुद्ध विहार (नखाते नगर कमान, रहाटणी फाटाजवळ) येथून सुरू होणार आहे. त्यानंतर सारनाथ बुद्ध विहार, जीवनज्योती हॉस्पिटल, चॅलेंजर पब्लिक स्कूल मार्गे महाबोधी बुद्ध विहार (जगताप नगर, पिंपळे सौदागर) येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमात आदरणीय भंते धम्मानंद हे धम्मदेशना व मार्गदर्शन करणार असून रात्री ९.०० वाजता सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन सारनाथ बुद्ध विहार (रहाटणीगाव), महाबोधी बुद्ध विहार (पिंपळे सौदागर), आनंद बुद्ध विहार (शास्त्रीनगर, रहाटणी), फिल ग्रुप (पिंपळे सौदागर), वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ (रहाटणी), भारतीय बौद्धजन विकास समिती (पिंपरी-चिंचवड शहर), राहुल मित्र मंडळ (रहाटणी), तक्षशिला सेवा संस्था (पिंपळे सौदागर), यशोधरा महिला मंडळ (पिंपळे सौदागर), आनंद मित्र मंडळ (शास्त्रीनगर, रहाटणी) व भिमशक्ती मित्र मंडळ (पवनानगर, रहाटणी) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

———————

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल 

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *