शिष्यवृत्ती परीक्षेत प्रज्वल कांबळे प्रथम

शिष्यवृत्ती परीक्षेत प्रज्वल कांबळे प्रथम

सांगली । प्रदीप लोखंडे 

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा, जि. सांगली) येथील अरिहंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२५-२६ मध्ये प्रज्वल प्रभाकर कांबळे याने तब्बल २३८ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा निकालातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. पार्थनाथ तात्यासो पाटील याने २०० गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. आरुष अनंत दवंडी याने १८० गुण, ऋत्विज सागर नागरे याने १७६ गुण, ओमराज लहू पॉलेंकर याने १६२ गुण, श्रद्धा विजय पवार हिने १५४ गुण, श्रद्धांजली शिवप्पा टिकोटी हिने १३८ गुण तर वेदांत शिवाजी मोते याने १२८ गुण मिळवत यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थापक, अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक वर्गातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

————————

शिष्यवृत्ती

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत