पिंपरी । राईट अँगल
पीएमआरडीएचे पोलीस अधीक्षक अमोल झेंडे यांची बदली रद्द करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार त्यांची मीरा भाईंदर वसई-विरार येथे पोलीस उपआयुक्त म्हणून झालेली बदली रद्द करून त्यांची पुन्हा पोलीस अधीक्षक, पीएमआरडीए, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
२९ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पीएमआरडीएमधील प्रशासकीय कामकाजात सातत्य राहणार असून विविध प्रलंबित प्रकरणांच्या चौकशी व समन्वय प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अमोल झेंडे यांनी यापूर्वीही पीएमआरडीएमध्ये विविध महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या बदली रद्द झाल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
————————-
बातमीसाठी संपर्क : ७३५०२६६९६७
