मोशी टोलनाका खून प्रकरण उघड; भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून चौघांना अटक

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद; मुख्य आरोपीचा शोध सुरू

पिंपरी : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोशी टोलनाक्याजवळ झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसांत छडा लावत चौघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मोशी टोलनाक्याजवळील युवराज गार्डन हॉटेलमध्ये अनिल मारुती गोळे ऊर्फ मोरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करून खून केला होता. याप्रकरणी नागनाथ कुंडलिक चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती संकलित करत तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी नागेश लक्ष्मण काळे (वय २९), अजय सर्जेराव गायकवाड (वय २०), अजय सिकंदर आव्हाड (वय २७) आणि दत्ता चत्रभुज शिनगारे (वय ३०) यांना १५ मे रोजी अटक केली. न्यायालयाने आरोपींना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नितीन दिगंबर धोत्रे, रा. भोसरी याचा शोध सुरू असून त्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत म्हावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगत, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार आणि पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तसेच प्रशांत सोरटे, संजय जरे, चंद्रकांत गवारी, गणेश बोऱ्हाडे, चंद्रकांत असवले, स्वप्नील शेलार, राहुल लाखंडे, प्रविण मुळुक, बाजीराव सानप, स्वप्नील झनकर, नितीन खेसे, आनंद जाधव, अक्षय क्षिरसागर, गजानन आढे, अशिष गोपी, सुहास कोंडेदेशमुख, गोटीराम पाखरे आणि तांत्रिक विभागाचे राजू जाधव यांनी ही कारवाई केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार करीत आहेत.

——————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, राईट अँगल 

संपर्क क्रमांक : 7350266967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *