“‘मी स्वतः सिकलसेलचा वाहक आहे’ | वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची जाहीर कबुली, लग्नापूर्वी रक्ततपासणीचे आवाहन”

नागपुरातील शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात नागालँडचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप तामगाडगे यांनी आपण सिकलसेलचे वाहक असल्याचे जाहीरपणे सांगितले.
सिकलसेलवरील मौन तोडण्याचे आवाहन करत त्यांनी लग्नापूर्वी रक्ततपासणी आणि योग्य वैद्यकीय समुपदेशनाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना ‘अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती’ देण्यात आली.
तुकाराम मुंढे यांनीही विद्यार्थ्यांना मोबाईलचा सुज्ञ वापर आणि माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला दिला.

Continue reading

जाती मोडू नये म्हणून धर्मांतर बंदी कायदा ?

बौद्ध प्रभावाच्या काळात ब्राह्मणी धर्माने आपली जातीव्यवस्था आणि धर्म टिकवून ठेवण्यासाठी ‘परधर्म भयावह’ अशी भीती भगवद्गीतेच्या माध्यमातून लोकांच्या मनात ठोकून दिली. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, मध्ययुगात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम धर्मांतरे होण्यापूर्वीच देशातील सर्वसामान्य जनता जैन, लिंगायत, महानुभाव आणि शीख अशा वेगवेगळ्या समतावादी धर्मांकडे आकर्षित होऊन धर्मांतरित झाली होती. पुढे आधुनिक काळात ख्रिश्चन धर्माचे आगमन झाले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन झाले. या सर्व घडामोडींत हिंदू धर्मात बाहेरून धर्मांतर होऊन येणे कधीच शक्य नव्हते; कारण नव्या व्यक्तीला नेमक्या कोणत्या जातीत सामावून घ्यायचे, हा एक न सुटणारा प्रश्न आहे. म्हणूनच, सद्यस्थितीतील ‘धर्मांतर बंदी कायदा’ हा प्रत्यक्षात धर्म वाचवण्यासाठी नसून, जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठीच आणला गेला आहे.

Continue reading