रायगडच्या पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल; भव्य पत्रकार भवनाच्या मागणीला महसूलमंत्री बावनकुळे यांची तात्काळ मंजुरीची ग्वाही

रायगड जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्याच्या मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सकारात्मक प्रतिसाद. राईट अँगल मराठीचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना. रायगडच्या पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल.

रायगडच्या पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल; भव्य पत्रकार भवनाच्या मागणीला महसूलमंत्री बावनकुळे यांची तात्काळ मंजुरीची ग्वाही

Meta Description

पत्रकार धम्मशील सावंत यांची थेट महसूलमंत्र्यांकडे मागणी; “जागा उपलब्ध करून देतो, प्रस्ताव सादर करा” चंद्रशेखर बावनकुळे

Raigad | राईट अँगल मराठी प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त पत्रकार भवन (patrakar bhavan raigad) मिळावे, या महत्त्वपूर्ण मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (revenue minister chandrashekhar bavankule) यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राईट अँगल मराठीचे (Right angle marathi) प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी अलिबाग (alibag)येथे झालेल्या कार्यक्रमात हा विषय थेट महसूलमंत्र्यांसमोर मांडला. यावेळी मंत्री बावनकुळे (chandrashekhar Bavankule) यांनी अलिबाग या जिल्ह्याच्या मुख्यालयात पत्रकार भवन उभारण्याच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला. तसेच तात्काळ रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे (kishan jawale) यांना आवश्यक त्या सूचना देत पत्रकारांच्या सहकार्याने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.

पत्रकारांच्या अडचणी, वाढती कामाची व्याप्ती आणि जिल्ह्यात स्वतंत्र पत्रकार भवनाची गरज याबाबत सविस्तर मांडणी करताना राईट अँगल मराठीचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर रायगडमध्ये आधुनिक पत्रकार भवन उभारण्याची मागणी केली.

यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ सकारात्मक भूमिका घेत, “जागा उपलब्ध करून देतो, प्रस्ताव सादर करा. मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर रायगडमध्येही पत्रकार भवन उभारण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही केली जाईल,” असे आश्वासन दिले. याचवेळी त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना पत्रकारांच्या सहकार्याने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

पत्रकार भवनाचे होणारे प्रमुख फायदे

  • जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी कायमस्वरूपी हक्काचे कार्यालय उपलब्ध होईल.
  • पत्रकार परिषद, बैठका, प्रशिक्षण कार्यशाळा आणि चर्चासत्रांसाठी स्वतंत्र सभागृह उपलब्ध होईल.
  • ग्रामीण व तालुकास्तरीय पत्रकारांना कामासाठी केंद्रस्थानी सुविधा मिळतील.
  • डिजिटल मीडिया, संपादन, इंटरनेट व माहिती केंद्रासारख्या आधुनिक सुविधा विकसित करता येतील.
  • विविध पत्रकार संघटनांमध्ये समन्वय वाढून पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करता येईल.
  • पत्रकारांच्या व्यावसायिक विकासाला चालना मिळून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अधिक बळकटी मिळेल.

दरम्यान, महसूल मंत्र्यांनी दिलेल्या या सकारात्मक आश्वासनामुळे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पत्रकार भवनाच्या उभारणीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


राईट अँगल मराठीचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे रायगडमध्ये पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

Team right angle news

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत