बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनचा वनसंवर्धनासाठी पुढाकार; आसानेवाडीत ४०० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड
दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी मौजे. आसानेवाडी च्या सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त वनक्षेत्र कंपा. नं. ६३३/६३४ मध्ये वनमोहात्सव २०२६-२०२७ कालावधीत वनीकरणाचे ध्येय गाठणे, वनच्छादित क्षेत्र वाढवणे, वनसंपत्तीचे शाश्वत व समसमान व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन, सामूहिक वनव्यवस्थापन समिती, आसानेवाडी व वातावरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. २०२३ ते २०२५ या कालावधीत सामूहिक वनव्यस्थापन समिती, आसनेवाडी च्या वतीने स्थानिक प्रजातींच्या ३२२० इतक्या रोपांची जवळपास ८ हेक्टर इतक्या वनक्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात आली होती.
