दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी मौजे. आसानेवाडी च्या सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त वनक्षेत्र कंपा. नं. ६३३/६३४ मध्ये वनमोहात्सव २०२६-२०२७ कालावधीत वनीकरणाचे ध्येय गाठणे, वनच्छादित क्षेत्र वाढवणे, वनसंपत्तीचे शाश्वत व समसमान व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन, सामूहिक वनव्यवस्थापन समिती, आसानेवाडी व वातावरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. २०२३ ते २०२५ या कालावधीत सामूहिक वनव्यस्थापन समिती, आसनेवाडी च्या वतीने स्थानिक प्रजातींच्या ३२२० इतक्या रोपांची जवळपास ८ हेक्टर इतक्या वनक्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात आली होती.
वनमोहात्सव २०२६-२०२७ च्या कालावधीत वृक्ष लागवडीच्या मोहिमेस मा. विद्यमान सरपंच उत्कर्षा बेलोसे, गट विकास अधिकारी मा. लता मोहिते (सुधागड-पाली), वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे (सुधागड-पाली), वातावरण फाउंडेशनचे संस्थापक व संचालक भगवान केसभट, बजाज इलेक्ट्रिकले लिमिटेडच्या सिएसार हेड श्रेया सुधीर, बजाज इंडेफचे अधिकारी / कर्मचारी तसेच सामूहिक वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व स्थानिक आदिवासी समुदायाचे सदस्य उपस्थित होते.

जंगलांचे अस्तित्व हे सर्वांसाठी लाईफ लाईन आहे. वनांचे संरक्षण, संवर्धन हि काळाची गरज आहे. अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत, अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या अंतिम चरणावर आहेत अशा काळात सामूहिक वनव्यवस्थापन समिती, आसानेवाडी, वन विभाग आणि वातावरण फाउंडेशन यांचा समन्वय प्रशंसनीय आहे असे मत बजाज इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या सीएसआर हेड श्रेया सुधीर यांनी केली.
पुढे त्या म्हणाल्या बजाज इलेक्ट्रिकल फाऊंडेशनच्या वतीने असानेवाडी येथे वन तलाव खोदण्यासाठी व असानेवाडीमध्ये १० सोलर स्ट्रीट लाइट्स बसवण्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याची अधिकृत घोषणा बजाज इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या सीएसआर हेड श्रेया सुधीर यांनी केली. वृक्षलगवडी दरम्यान त्या बोलत होत्या.
आदिम आदिवासी लोकसमुदायांच्या वनसंवर्धन मोहिमेसाठी शहरी भागात कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एकूण २० हून अधिक सुशिक्षित शहरी मंडळींची साथ लाभली, ही महत्वाची बाब आहे. शहरांचा विकास होताना शहरी भागातील सुशिक्षित मंडळींनी ग्रामीण भागातील जंगलांकडे दुर्लक्ष केलेले नाही हेच बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्यातून व बजाज इंडेफच्या कृतीशील सहकार्यातून अधोरेखित होते. असे मत मा. केसभट यांनी व्यक्त केले. ते वृक्षलगवडी दरम्यान बोलत होते.
आपल्या आर्थिक मदतीची घोषणा आम्हाला बळ देणारी आहे. २०२३ ते २०२५ दरम्यान लागवड करण्यात आलेल्या झाडांची निगा राखणे, रोपांना नियमित पाणी पुरवठा करणे, लागवड करण्यात आलेल्या रोपांन भोवती आळे तयार करणे आशा जबाबदऱ्या असानेवाडीतील १५ महिलांना विभागून देण्यात आल्या होत्या, तसेच आज लागवड करण्यात आलेल्या रोपांची निगा राखणेच्या अनुषंगाने रोपांना उन्हाळ्यात नियमित पाणीपुरवठा करणे, रोपांच्या चहू-बाजूनी आळे तयार करणे, ग्रीननेटच्या जाळीचे कुंपण करणे, लागवड करण्यात आलेल्या रोपे वणवा किंवा गुरांच्या ये-जा करण्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून लागवड करण्यात आलेल्या वन क्षेत्राच्या भोवती नैसर्गिक कुंपण तयार करणे व वन तालाव खोदणेचे नियोजन सर्वानुमते तयार करण्यात आले आहे. तसा आमच्या असानेवाडी रोहयो ग्रामसभेच्या वतीने ठराव मंजूर करण्यात आला आहे. असे मत किसन मोरे, अध्यक्ष, अध्यक्ष सामूहिक वन व्यवस्थापन समिती, आसानेवाडी यांनी मत मांडले.
वृक्षलागवडीच्या मोहिमेमुळे वनच्छादित क्षेत्राचे प्रमाण वाढणार तर आहेच पण सोबतच हाताला मजुरीही मिळणार असल्याने अधिकाधिक लोक विशेषतः महिला या मोहिमेत सहभागी होतील याची खात्री आहे असे मत मुक्ता कोळी, सदस्य (सामुहिक वन व्यवस्थापन समिती, असणेवाडी) यांनी व्यक्त केले.
आदिवासी समुदाय, स्थानिक प्रशासन, वातावरण, बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन व बजाज इंडेफ सारख्या संस्था, कार्पोरेट क्षेत्रातील मंडळींची मिळालेली साथ सिद्ध करते की, वनीकरण किंवा वनसंपत्तीचे समसमान व्यवस्थापन हे सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून होऊ शकते. सामूहिक वनव्यवस्थापन समिती, आसनेवाडी यांची गेल्या ३ वर्षांपासून वनसंवर्धनासाठी सुरू असणारी सस्तत्यपूर्ण कृती सर्वांसाठी आदर्श आहे असे मत मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, सुधागड पाली यांनी व्यक्त केले.

वनांवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असणाऱ्या लोकांसाठी बजाज जाज इलेक्ट्रिकल फाऊंडेशनच्या व बजाज इंडेफ यांचे सहकार्य मोलाचे आहे. हा समुदाय आपल्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे स्थलांतर-मुक्त होऊ शकतो. असे विचार लता मोहिते, गट विकास अधिकारीयांनी व्यक्त केले.
रोपांना नियमित पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने सामूहिक वनक्षेत्र वन तलाव खोदण्यासाठी आर्थिक पाठबळ या संस्थांच्या माध्यमातून झाले आहे. वन तलाव खोदण्यासाठी वाडीतील एकूण १५ कुटुंबांना ९० दिवांचा नियमित रोजगार निर्माण होणार आहे. असून स्थानिक नागरिकांचे स्थलांतर कमी होण्यास मदत होणार आहे. . त्यासाठी वनविभागाने लिखित परवानगी दिली आहे त्याबद्दल आम्ही वनविभाग, सुधागड पाली, वातावरण व बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन व बजाज इंडेफ यांचे स्वागत व अभिनंदन करतो. या मोहिमेमुळे पुढील ३ वर्षांत गौण वनउपज वाढून आम्हाला स्थानिक पातळीवर रोजगाराचे किंवा उत्पादनाचे शाश्वत साधन तयार होणार असल्याचे मत अध्यक्ष, (सावव्यस आसानेवाडी) यांनी व्यक्त केले.
बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन सारख्या कार्पोरेट कंपन्यांचे ग्रामीण भागातील वनांचे संरक्षण करणे व वाणांचे क्षेत्र वाढवणे मधे दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. याचा आदर्श शहरी मंडळींनी आपल्या श्वासाचा/ जगण्याचा शाश्वत स्रोत असणाऱ्या वाणांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी घ्यावा, आमच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आव्हान यावेळी केसभट यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क:
अंकुश लोणकर: 70571 42127
शिवाजी हिरडे: 87936 37353
राहुल सावंत : 9930749875
