तासगावात FDA च्या नाकाखाली गुटख्याची उघड विक्री, ‘होम डिलिव्हरी’ आणि ‘इन्फॉर्मर’मुळे धाडी फसतात का?
राज्यभरात अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA ने गुटखा बंदीसाठी कडक कारवाई सुरू असताना, सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात मात्र बंदी असलेला गुटखा अगदी ‘होम डिलिव्हरी’ सह राजरोसपणे विकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या महिन्यात काही काळ गायब झालेला गुटखा आता पुन्हा उघडपणे विक्रीला आल्याने सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
