Maratha Empire Map Removed । मराठा साम्राज्याचा नकाशा वगळला ।सांगलीच्या वकिलांनी केंद्र सरकारकडे केली तक्रार दाखल ।
मुंबई : शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर थेट केंद्र सरकारकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील सोनसळ (Sonsal) येथील ॲड. विश्राम अशोक कदम यांनी एनसीईआरटी (NCERT) तसेच शिक्षण मंत्रालयाकडे ही तक्रार दाखल केली असून संबंधित निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
