निष्ठावंतांना डावलत राष्ट्रवादीची आयात उमेदवारी; विक्रम काकडे यांच्या निवडीवर पक्षात नाराजी
विलास लांडे, सुनील टिंगरे, योगेश बहल यांच्यासह अनेक इच्छुकांना डावलल्याची चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण
विलास लांडे, सुनील टिंगरे, योगेश बहल यांच्यासह अनेक इच्छुकांना डावलल्याची चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण
खानापूर–आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी गलाई बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांना विधानसभेत आवाज दिल्यानंतर त्यांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर All Kerala Gold and Silver Maratha Associationच्या पदाधिकाऱ्यांनी विटा येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. बैठकीत कारागीरांवरील चौकशी, कायदेशीर संरक्षण आणि मदत यंत्रणा उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
तासगाव तालुक्याच्या सिंचन प्रश्नावरून माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil ) यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणी येत असल्याचे पोकळ दावे करत आहेत,असा थेट आरोप संजयकाका पाटील यांनी आज सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनादरम्यान केला. तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यात विद्यमान यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र सध्या दिसत असल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.