रत्नागिरीत पाटबंधारे विभागाचा ‘मोठा मासा’ गळाला; २ लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता, लिपिक एसीबीच्या जाळ्यात

पाटबंधारे विभागातील आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मोठी कारवाई शुक्रवारी रत्नागिरीत उघडकीस आली. कपात करण्यात आलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सिंचन विभागासह शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Continue reading