Tasgoan water crisis । तासगावच्या शेतीला आवर्तनाची प्रतीक्षा! संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्या नेतृत्वाखाली 30 मार्चला ठीय्या आंदोलन .
तासगाव तालुक्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मार्च अखेर आला तरी उन्हाळी आवर्तन सुरू न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
पाण्याअभावी ऊस व द्राक्ष शेती संकटात सापडली असून मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ३० मार्च रोजी संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
