Tasgoan water crisis । तासगावच्या शेतीला आवर्तनाची प्रतीक्षा! संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्या नेतृत्वाखाली 30 मार्चला ठीय्या आंदोलन .

संकेत पाटील /तासगाव

तासगाव तालुक्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. मार्च महिना संपत आला तरी प्रशासनाकडून उन्हाळी आवर्तन (Summer Irrigation Rotation) सुरू करण्यात आलेले नाही. या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी माजी खासदार संजयकाका पाटील आणि युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी, ३० मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता तासगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयावर लाभधारक शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन (Farmers Dharna Protest Tasgaon) करण्यात येणार आहे.

या संदर्भात कार्यकारी अभियंता (ताकारी पंपगृह विभाग, देवराष्ट्रे) आणि कार्यकारी अभियंता (टेंभू उपसा सिंचन, ओगलेवाडी) यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, चिंचणी, पुणदी, भैरववाडी, उपळावी, मतकुणकी, वंजारवाडी, आळते आणि सोनी ही गावे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात येतात. तसेच मणेराजुरी, सावडे, बलगवडे, बस्तवडे, खुजगाव, वाघापूर, लोढे, कौलगे, डोर्ली, आरवडे, मांजडे, हातनूर, गोटेवाडी, हातनोली, धामणी, पाडळी, पेड, सावळज आणि चिंचणी ही गावे विसापूर-पुणदी व टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात येतात.

सध्या या संपूर्ण परिसरातील येरळा नदी (Yerala River Water Crisis) पात्र कोरडे पडले आहे. लाभक्षेत्रातील गावांमध्ये ऊस आणि द्राक्ष शेतीचे मोठे क्षेत्र असून सध्या द्राक्षबाग छाटणी आणि उसासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असतानाच पाणीटंचाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार १ मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सुरू (Irrigation Water Release Maharashtra) होणे अपेक्षित होते, परंतु मार्च अखेर उजाडली तरी योजना बंदच आहेत. आवर्तन सुरू करण्यास आणखी विलंब झाल्यास शेवटच्या टोकाच्या गावांपर्यंत पाणी पोहोचण्यास महिनाभराचा काळ जाईल, ज्यामुळे शेती उत्पादन घट (Crop Loss Maharashtra Farmers) होऊन शेतकऱ्यांचे अपरिमित आर्थिक नुकसान होणार आहे.

प्रशासनाचा हा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून ताकारीच्या मुख्य कालव्यातून येरळा नदीत तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी तासगावात शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. (Tasgaon Farmers Protest News) या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *